स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत 15 ग्रामपंचायतींना उद्या पुरस्काराचे वितरण

0
भुसावळ:– स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत 15 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर ग्रामपंचायत सरपंचांसह ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तालुकास्तरीय समितीने प्रत्येक ग्रामपंचायतीची पाहणी करून तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची निवड केली आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ध्वजारोहणावेळी सकाळी सात वाजता संबंधीत ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ग्रामसेवकांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या ग्रामपंचायती अशा, कंसात तालुक्याचे नाव
जिल्ह्यातील एक हजार 150 ग्रामपंचायतीपैकी 15 ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत निवड झाली असून त्यात मेहरगाव (ता.अमळनेर), लोण प्र.भ. (भडगाव), फुलगाव (भुसावळ), ऐनगाव (बोदवड), हातले (चाळीसगाव), वटार (चोपडा), मुसळी (धरणगाव), भातखेडा (एरंडोल), वराड बु.॥ (जळगाव), हिवरखेडा बु.॥ (जामनेर), नांदवेल (मुक्ताईनगर), पहाण (पाचोरा), चोरवड (पारोळा), तांदलवाडी (रावेर), चिंचोल (यावल) या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.