भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू विजय फिरके यांनी माथेरान येथे नुकत्याच झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. दगडधोड्यांचा पन्नास किलोमीटरचा मार्ग त्यांनी सहा तास २२ मिनिटे व ३६ सेकंदात पूर्ण केला.
‘रन बडीज रेसेस’ ने माथेरान एन्डुराथॉन ( रनिंग) स्पर्धेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, ही स्पर्धा डांबरी रस्त्यावर नव्हती तर दगडधोंडे असलेल्या कच्च्या रस्त्यावर होती. या स्पर्धेत पुणे, मुंबई, नाशिक, पुणे व राज्यातील इतर ठिकाणांसह बाहेरील राज्यातूनही सुमारे ३५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भुसावळचे विजय फिरके (वय ५७) यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा खूप खडतर व अवघड होती. त्यांनी सहा तास २२ मिनिटे व ३६ सेकंद या वेळेत ती पूर्ण करून ४० पेक्षा जास्त वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
भुसावळला परत आल्यावर भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे डॉ. तुषार पाटील, प्रवीण पाटील, संजय भदाणे, तरुण बिरिया, मुकेश चौधरी, अजय आंबेकर, संतोष घाटगे, गनसिंग पाटील, सारंग चौधरी, प्रशांत वंजारी, डॉ. संजय नेहेते, विलास पाटील, राजेंद्र ठाकूर, प्रशांत वंजारी ,डॉ. स्वाती फालक, डॉ. चारुलता पाटील, डॉ. नीलिमा नेहेते, माधुरी चौधरी, ममता ठाकूर , शैला भारंबे , आरती चौधरी व इतर सर्व मान्यवर सदस्यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.