LIVE: भुसावळ विधानसभा मतदारसंघ: संजय सावकारे यांना निर्णायक आघाडी !

0

भुसावळ: पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असणारे आमदार संजय सावकारे यांना आता भक्कम आघाडी मिळाली असून ते विजयाकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(भुसावळ मधील अपडेट्ससाठी थोड्या वेळेत हीच लिंक रिफ्रेश करत रहा.)

भुसावळमध्ये संजय सावकारे आणि राष्ट्रवादीचे जगन सोनवणे यांच्यात मुख्य लढत झाली. यात संजय सावकारे यांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान दोघांनी मतमोजणीच्या ठिकाणी सोबत जेवण घेतल्याने सगळेच आवक झाले. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून दोघांना ओळखले जाते.

आमदार संजय सावकारे यांना १७००० जर मतांची आघाडी मिळाली आहे. जवळपास ही विजयी आघाडी आहे.

आमदार संजय सावकारे यांना महाआघाडीचे जगनभाई सोनवणे, अपक्ष डॉ. मधू मानवतकर आणि अपक्ष सतीश घुले यांनी आव्हान दिले होते. यात संजय सावकारे यांची बाजू पहिल्यापासून मजबूत मानली जात होती. विशेष करून नाथाभाऊंच्या संकटकाळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिल्याचा सावकारेंना लाभ होणार असल्याचे मानले जात होते. या पार्श्‍वभूमिवर, टपाली मतगणनेपासून ते आघाडीवर होते. आता त्यांना दहा हजारांपेक्षा जास्त आघाडी मिळाली असून विद्यमान ट्रेंड पाहता संजय सावकारे यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.