भुसावळ l राजकीय धक्के देण्यात माहीर असलेले शहर अशी भुसावळ ची ओळख आहे.वर्ष भरात अनेक धक्के शहरातील नागरिकांना पाहिले आहेत. अशातच माजी आ.संतोष चौधरी यांनी एका गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने नवीन राजकीय समीकरणे उदयास आल्यास अचंबित वाटू नये.
भुसावळ मतदारसंघात लेवा समाजाची लोकसंख्या अधिक आहे आणि या समाजावर आ.एकनाथराव खडसे यांची चांगली पकड आहे. आ.खडसे व आ. सावकारे यांनी नगर पालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळवून दिला होता. पण मागील वर्षी खडसे यांनी भाजपा त्यागून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केला. खडसे समर्थकांनी सुध्दा खडसे यांच्या उपस्थितीत ना. अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.(काहींनी स्वतः तर काहींनी स्वतः ऐवजी कुटुंबातील सदस्य यांचा प्रवेश करून घेतला होता.
परंतु काही काळानंतर आ. सावकारे यांनी यशस्वी पणे अनेकांची घर वापसी करत आ. खडसे यांना धक्काच दिला.माजी आ.संतोष चौधरी व आ. एकनाथराव खडसे दोन्ही एकाच पक्षात असून एकत्र येतील का ?असा प्रश्न उपस्थित होता. परंतु अनेक कार्यक्रमात हे दोन्ही मत्ताबर एकाच व्यासपीठावर आले असून येत आहेत.
आणि नवीन चिन्ह घेऊन मैदानात उतरले होते. भाजपा चा विजय झाला असला तरी एकतर्फी विजय नव्हता हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.
माजी आ. चौधरी यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. निर्दोष सुटल्याशिवाय कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा चौधरी यांनी केली होती आणि आता ते निर्दोष झाले आहेत यामुळे त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्या मध्ये नवं उर्जा निर्माण झाली आहे.
माजी आ. संतोष चौधरी नगर पालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणूक बद्दल कोणती भूमिका घेतात ,कुणाला उमेदवारी देतात किंवा स्वतः लढतात ,आ. खडसे आणि माजी आ. संतोष चौधरी कोणती रणनीती आखातात यावर राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहे. तर भाजपाची मदार आ. संजय सावकारे व भाजपाच्या बड्या नेत्यांच्या रणनीती वर असू शकणार आहे.
माजी आ. संतोष चौधरी यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय समीकरणे नव्याने बनणार हे मात्र नक्की .