भुसावळ प्रतिनिधी l
शहरातील प्रभात क्र. ७ मधील अष्टविनायक कॉलनी, म्हाडा कॉलनी, चितोडे वाणी मंगल कार्यालय परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉकची कामे संपन्न झाली आहेत. सदर काम होवू नये म्हणुन अनेक समाज कंठकांनी विविध प्रकारे व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्याने सदर कामे वेळेत पुर्ण झाली आहेत याच कामांचा लोकार्पण सोहळा आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते पार पडला.
या परिसरातील विकास कामे मक्तेदार यांनी करू नये म्हणुन उच्च न्यायालयात स्थगिती (स्टे) आणण्याचा प्रयत्न करण्यात आला भविष्यात अनेक विकास कामे करायची आहेत म्हणुन झालेल्या रस्त्याची घरशांती प्रमाणे रस्ता शांती करणे आवश्यक आहे. म्हणुन रविवार, दिनांक २५ जून २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता रस्ता पुजन करून विधीवत पूजा करण्यात आली. या रस्त्यांचे भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाला माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, मनोज बियाणी, किरण कोलते, देवा वाणी, दिनेश राठी, गिरीश महाजन, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, वसंतदादा पाटील, अजय नागरणी, विशाल जंगले, पवन बुंदेले, योगेश पाटील यां उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन भाजप नगरसेविका अनिता सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते सतिष सपकाळे यांनी केले होते.