भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव 

0
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 26 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पदावर नियुक्ती केली आहे.  जळगाव मनपा आयुक्त पदी ठाणे अप्पर आयुक्त आदिवासी विकास या पदावर असलेले चंद्रकांत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर आयुक्त म्हणून  नगर प्रशासन संचालक  वीरेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची  म्हाडाचे उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने सदर पद रिक्त होते.   मुख्य सचिव पदावर नियुक्त झालेले  डी के जैन यांच्या पदोन्नती रिक्त झालेल्या अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग या पदावर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आयुक्त यु.पी.एस.मदान यांची  वर्णी लागली आहे.
वित्त विभागाचे प्रधान सचिव ए आर राजीव यांची एमएमआरडीए चे आयुक्त म्हणून नियुक्ती केली असून दिल्ली येथील राज्य सरकारचे प्रधान सचिव व राज्य शिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्रा यांची सिडकोच्या सिएमडी पदावर नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र  जीवनप्राधिकरणाचे  सदस्य सचिव संतोष कुमार यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र लघु उद्योग विकास विभागात पाठविले असून सामान्य प्रशासन विभागातील विशेष कार्य अधिकारी आणि सचिव एम एन केरकटा यांची सीईओ खादी ग्रामद्योग विभाग,विशेष आयुक्त विक्रीकर आयुक्त पराग जैन नानोटीया यांची व्यवस्थापकीय संचालक  पारेषण उर्जा विभाग येथे पाठविण्यात आले असून या ठिकाणी असलेले राजीव कुमार मित्तल यांची वित्त विभागाच्या (व्यय) सचिव पदावर नियुक्ती केली आहे.
एस.आर.दौंड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास विभाग यांची सचिव सामान्यत प्रशासन विभाग मंत्रालय येथे पाठविण्यात आले असून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले पी वेलरासू यांची सदस्य सचिव महारष्ट्र जीवनप्राधिकरण येथे तर संचालक आयटी विभाग यांना   संचालक नगरप्रशासन विभाग येथे नियुक्त केले असून मुख्याधिकारी मुंबई इमारत दुरुस्ती विकास मंडळ सुमित भांगे यांना व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास प्राधिकरण येथे नियुक्ती केली आहे.महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालाय विजय वाघमारे यांची सह व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण  मुंबई,सुभाष लाखे मुख्याधिकारी मुंबई गृहनिर्माण विभाग यांना सहसचिव वित्त विभाग मंत्रालय येथे पाठविण्यात आले आहे.
 दीपेंद्र सिंग कुशवाह यांची लाखे यांच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली असून बी.जी.पवार मीरा भाईंदर मनपा आयुक्त यांची जालना जिल्हाधिकारी,डी.के. जगदाळे व्यवस्थापकीय संचालक आदिवासी विकास महामंडळ यांची मुंबई बिल्डींग पुनर्बांधणी मंडळाच्या मुख्याधिकारी पदावर तर सुनील चव्हाण यांची रत्नागिरी च्या जिल्हाधिकारी पदावर पाठविण्यात आले आहे. या ठिकाणी असलेले पी प्रदीप यांना संचालक आयटी विभाग मंत्रालय,सहआयुक्त एमएमआरडीए यांची ठाणे अप्पर आयुक्त आदिवासी विकास या पदावर,या ठिकाणी असलेले चंद्रकांत डांगे यांना मनपा आयुक्त जळगाव मनपा येथे पाठविण्यात आले आहे.
परभणी जिल्हाधिकारी पी.शिवा शंकर यांना आदिवासी विकास महामंडळ नाशिक च्या व्यवस्थापकीय संचालक नाशिक येथे तर गडचिरोली चे जि.प. सीईओ शंतनू गोयल यांची परभणी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.अमरावती येथील सहायक जिल्हाधिकारी विजय राठोड यांना गडचिरोली जि.प. सीईओ,परभणी सहायक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची प्रकल्प संचालक आदिवासी विकास विभाग अमरावती आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास पगार यांना अकोला जि.प. सीईओ या पदावर पाठविण्यात आले आहे.