भूतानच्या विरोधी पक्षनेत्यांसोबत मोदींची चर्चा !

0

थिंम्पू: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर आहेत. काल शनिवारी ते भूतानला गेले, यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मोदींनी भूतान दौऱ्याप्रसंगी भारतीय नागरिकांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान मोदींनी आज भूतानमधील थिंम्पू येथील राष्ट्रीय स्मारक चोरटेनला भेट दिली. येथील मंदिरात मोदींनी पूजा केली. तत्पूर्वी मोदींनी भूतानचे विरोधी पक्षनेते पेमा ग्यामॅट्सो यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.