केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्याला मोठे यश; प्रथमच बंगाल-वाराणसी दरम्यान जलवाहतूक

0

नवी दिल्ली: वेळेत आणि दिलेल्या मुदतीत काम करणारे मंत्री म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची देशभरात ओळख आहे. नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा अशक्य गोष्ट शक्य करून दाखविले आहे. प्रसिद्ध वाहतूक मंत्री मुदती आत मिळविण्यासाठी आणि दर्जा काम नितीन गडकरी शक्य आणि असंभाव्य कार्य केले आहे. गंगा नदीत बंगाल ते वाराणसी दरम्यान पहिल्यांदा वाहतूक केली जाणार आहे. स्वतंत्र भारतात प्रथमच ही वाहतूक सुरु झाली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: १६ कंटेनरची पहिली तुकडीचे स्वागत करणार आहे. हे कंटेनर पेप्सी कंपनीचे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात २५०० कोटींचे विकास कामे सुरु आहे.

२८ ऑक्टोबरपासून कोलकाता येथून निघालेले जलपोत ८ नोव्हेंबरला रामनगर टर्मिनल येथे पोहोचले. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनगर येथे २८०.९० लाख रुपये किमतीचे नवनिर्मित देशातील पहिले आयडब्ल्यूटी मल्टीमॉडल टर्मिनल राष्ट्राला समर्पित करणार आहे.