मुंबई: बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी ७8 व्या वर्षात आज पदार्पण केले आहे. आज त्यांचा ७७ वा वाढदिवस आहे. सकाळपासून त्यांच्या चाहत्यांची त्यांच्या घरासमोर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी जमली आहे. यावेळी एका चाहत्याने चक्क ७७ नंबर हे बर्फाने बनविलेले आहे. कोल्हापूर येथील हा चाहता आहे.दरवर्षी अमिताभ बच्चन यांना चाहते वेगवेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देत असतात, यावेळी देखील चाहत्यांनी ती संधी गमाविलेली नाही.
बिग बी यांनी घराबाहेर येऊन चाहत्यांशी संवाद साधत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.