एकाच दिवशी प्रदर्शित होणार ‘हे’ तीन चित्रपट; प्रेक्षक कन्फ्यूज

0

नवी दिल्ली: येत्या १५ ऑगस्टला तीन धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित असलेला अक्षय कुमारचा मिशन मंगल, जॉन अब्राहीमचा बाटला हाऊस आणि बाहुबली फेम प्रभासचा साहो हे तीनही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे कोणता चित्रपट बघावा असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. कारण सामान्य व्यक्तीकडे इतका वेळ आणि इतका पैसा देखील नाही की ते तीनही चित्रपट थेटरमध्ये जाऊन पाहू शकतील. बघायला गेले तर तीनही चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता आहे.

अशा प्रकारे मोठ-मोठे चित्रपट एकाच वेळी आल्यास त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होत असतो. स्क्रीन विभागली जाते, कमाईत देखील विभाजन होत असते असे मत जाणकार यांनी व्यक्त केले आहे.