मुंबई : कॉन्ट्रोव्हर्शिअल शो ‘बिग बॉस १२’मध्ये घरातील सदस्यांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढत चाललेले आहे. नुकतेच लक्झरी टास्क खेळत असताना दीपिका कक्कड ही दीपक ठाकुरवर भयंकर चिडली. हे प्रकरण इतके वाढले की श्रीशांत समोर येऊन धक्के मारण्यावर उतरला.
#JasleenMatharu ka kehna hai ki #RomilChoudhary mein aagaya hai ahankaar, kya rakhenge woh ghar mein yeh harkatein barkaraar? Dekhiye #BB12 aaj raat 9 baje BB Panachayat ki dilchasp baaton ke liye. #BiggBoss12 pic.twitter.com/6e7neZTL2t
— Bigg Boss (@BiggBoss) November 27, 2018
दीपिकाने दीपिकवर हात लावू नकोस असे म्हणत त्याच्यावर ओरडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बीबी पंचायत टास्क दरम्यान, जसलीन मथारुने रोमिल चौधरीवर आरोप लावले की तो प्रत्येक सदस्याला कमजोर असे म्हणतो.
याप्रकरणी दीपिका जसलीन आणि सोमी खानशी संवाद साधण्यास गेली. यावेळी दीपक ठाकुर तेथे येऊन प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, दीपकने दीपिकाच्या हाताला स्पर्श केला. यावर दीपिका चांगलीच भडकली आणि ‘मला हात लावू नकोस’, असे म्हणाली.