मुंबई : सध्या बिग बॉस १२ व्या सीजनची टीआरपी कमी होत असल्याने बिग बॉसच्या घरात नुकताच मेघा धाडे आणि रोहितची वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली. आता हरियाणवी डान्सर सपना चौधरीची घरात एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्येक सीजनमध्ये दिवाळीच्या निमित्ताने जुने स्पर्धक नव्या घरात प्रवेश करतात. यंदा देखील ही परंपरा तशीच चालू राहण्यासाठी जुने स्पर्धक कार्यक्रमात सहभागी होतील. सपनाने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी तिचा डान्स कारणीभूत ठरला आहे. आता पुन्हा बिग बॉसच्या चाहत्यांना सपनाचा डान्स पाहायला मिळणार आहे.