नवी दिल्ली- कलर्स वाहिनीवरील सगळ्यांत वादग्रस्त शो ‘बिग बॉस12’व्या सिजनला काल सुरूवात झाली आहे. काल रविवारी रात्री या शोचा होस्ट सलमान खानने ‘बिग बॉस12’च्या घरात जाणाऱ्या जोड्यांची ओळख करून दिली दिली. या जोड्या पाहिल्यानंतर प्रेक्षक यंदाचे सीझन चांगलेच धमाल करणार असल्याचे दिसते.
‘बिग बॉस12’च्या घरात जाणारी सगळ्यांत चर्चित जोडी म्हणजे, भजनसम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेन्ड जसलीन मथारू यांची. काल ‘बिग बॉस12’ प्रीमिअरदरम्यान अनूप आणि जसलीन या दोघांनी नॅशनल टीव्हीवर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. ६५ वर्षांचे अनूप जलोटा अतिशय ग्लॅमरस अन् बोल्ड जसलीनला डेट करत आहेत. ती त्यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे. आजपर्यंत अनूप व जसलीन दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले आणि अखेर नॅशनल टीव्हीसमोर याचा खुलासा केला.
दरम्यान अनूप व जसलीन यांचे नात्यांवर प्रेक्षकांची प्रतिक्रिया विचाराल तर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. काही जण यात काही गैर नाही, असे सांगणारे आहेत. पण बहुतांश लोकांनी अनूप इतक्या लहान मुलीला कसे डेट करू शकतात, असा प्रश्न विचारला आहे. तुम्ही नेटिजन्सच्या प्रतिक्रिया खाली वाचू शकतात.
अनूप जलोटा यांनी तीन लग्ने केलीत. त्यांच्या तिस-या पत्नीचे नाव मेधा गुजराल आहे. आता त्यांच्या या नव्या रिलेशनशिपच्या खुलाशानंतर ‘बिग बॉस12’ अधिकचं रोचक होणार आहे.
पहा यूट्यूबवर… बिग बॉस १२ मधील कलाकार आणि त्यांना मिळणारे मानधन