Big braking : गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग

नंदुरबार- नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुटलेल्या गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग आग लागल्याची घटना रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली.  प्रवासी तात्काळ गाडीतून बाहेर उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे प्रशासनासह नंदुरबार शहर पोलीस व नगरपालिका अग्निशमन बंबाच्या पथकाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.

 

 

नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर गाडी असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशी तात्काळ गाडीतून बाहेर पडले. सुरुवातीला ट्रेनमधील पॅन्ट्रीच्या डब्याला ही आग लागली. आग तात्काळ वेगाने पसरली आणि शेजारील दोन डब्यांना आग लागली. आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते . आग लागलेला डबा इतर गाडीपासून वेगळा करुन आग विझवण्याचं काम सुरू केलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनास्थळी नंदुरबार अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे.