BIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान

0

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज शुक्रवारी २५ रोजी बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. २४३ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे.  पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७१ जागांसाठी निवडणूक होणार, दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ जागांसाठी निवडणूक होईल तर शेवटच्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीची घोषणा केली.

पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोंबर, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबर तर शेवटचा टप्पात  ७ नोव्हेंबरला मतदान  होणार आहे. निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होईल.

३७ कोटी ७९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात ३ कोटी ७९ लाख पुरुष तर ३ कोटी ३९ लाख महिला मतदार आहेत. कोरोनाग्रस्तही मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रीयेच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाग्रस्त मतदान करतील. निवडणूक प्रचार केवळ व्हर्च्युअल पद्धतीनेच होणार आहे. डिजिटल माध्यमांचा यासाठी अधिक वापर होणार आहे. पाच पेक्षा अधिक लोक घरी जाऊन प्रचार करणार नाहीत असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

सहा लाख पीपीई कीटचा वापर होणार आहे. ६ लाख फेसशिल्ड, ४६ लाख मास्क, २३ लाख हँड ग्लोज, ७ लाख सॅनिटायझरचे वाटप यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मतदानाचा कालावधी वाढविला
सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान कालावधी एका तासासाठी वाढविण्यात आले आहे. कोरोनाच्या कठीण काळात देशातील ही पहिलीच निवडणूक आहे. अनेक कारणांनी ही ऐतिहासिक निवडणूक आहे. कोरानाच्या काळात घाव्याची खबरदारीबाबत निवडणूक आयोगाने सूचना केल्या आहेत. सर्व खबरदारी घेऊन ही निवडणूक कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शक सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. कोरोनामुळे ७० पेक्षा अधिक देशाने निवडणूक स्थगित केली. मात्र निवडणूक ही लोकशाहीतील महत्त्वाचा घटक असून नागरिकांचा तो अधिकार आहे असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

असे होणार मतदान
१. एका मतदान केंद्रावरील मतदान करण्याची संख्या कमी करण्यात आली आहे. बूथवर एक हजार मतदार मतदान करतील.

२. १.८९ लाख बॅलेट युनिट मशीन असणार आहेत.

३. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा आहे.

४. निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीवर दाखल गुन्हांची माहिती सार्वजनिक करावी लागणार आहे. वृत्तपत्रातून माहिती सार्वजनिक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

५. प्रचारासाठी एकावेळी रत्यावर फक्त पाच गाड्या वापरता येतील. एका वेळी घरी पाच पेक्षा अधिक लोक जाऊन प्रचार करणार नाहीत.