Big breaking : महानगरपालिकेच्या पथकाची डी मार्ट वर धाड 

 

जळगाव – महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने आज सायंकाळी अचानक डी मार्टवर धाड टाकली. यावेळी डिपार्ट मधल्या नियोजनाचा आढावा महानगर पालिकेच्या पथकाने घेतला.

 

नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे की नाही? , गर्दी होत आहे की नाही? सोशल डिस्टंसिंग चे पालन केले जात आहे की नाही? या सर्व बाबींकडे महानगर पालिकेच्या पथकाने लक्ष दिले. यावेळी सर्व नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने होत असल्याचे महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या निदर्शनास आले.

कारवाई करताना संजय आत्तरदे ,संजू पवार, दादा कोळी, जबिल शेख आदी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

 

नोटीस बजावली जाणार

महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे नोटीस बजावली जाणार आहे. डी मार्टमध्ये योग्य पद्धतीने सोशल डिस्टंसिंग चे पालन होत असल्याचे ही नोटीस बजावण्यात येणार आहे.