Big Breaking – मोठ्या वादळानंतर फडणवीसांचा जळगाव दौरा

जळगाव – रावेर मुक्ताईनगर परिसरात आलेल्या चक्रीवादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेला आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा दिनांक 1 जून रोजी जळगाव जिल्हात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी दिली आहे. या दौऱ्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीष महाजन, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे,खासदार रक्षा खडसे,जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके व नंदू महाजन व या भागातील लोकप्रतिनिधी भाजपा पदाधिकारी हे सोबत असतील. सदरचे प्रसिद्धी पत्र हे जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या सहीने कार्यालय मंत्री गणेश माळी यांनी प्रसिद्ध केले आहे.