शिदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! परमबीर सिंग यांचे निलंबन घेतले मागे

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप महाराष्ट्र सरकारने मागे घेतले. राज्य सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये जारी केलेले निलंबन आदेश रद्द केले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यानंतर परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तेव्हा परमबीर सिंह म्हणाले होते की, अनिल देशमुख यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाढे यांना आठवड्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याशिवाय अनिल देशमुख यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात जावे लागले होते.