एका चूकीमुळे सनी लिओनी बनली ५१ वर्षाची !

0

लखनौ-उत्तर प्रदेशात निवडणूक यादी अपडेट केली जात असून मतदार यादीत मोठी घोडचूक झाल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी यांचा मतदार यादीत चक्क ५१ वर्षीय महिलेच्या नावापुढे फोटो आहे. एवढेच नाही तर काही मतदारांच्या नावासमोर चक्क कबूतर आणि हरीणचा फोटो लावण्यात आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार ही चूक असून ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशात 2019 लोकसभा निवडणुकीआधी मतदार याद्या अपडेट करण्याचे काम सुरु आहे. मतदार याद्या अद्याप तपासल्या जात असून त्या सार्वजनिक करण्यात आलेल्या नाहीत. मात्र स्थानिक पत्रकारांच्या हाती ही दोन पानं लागली असून ती लीक झाली आहेत. या प्रकरणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे.