लंगडा आंबा वनक्षेत्रात शिकारी व वनविभागात धुमश्चक्री ; जोरदार गोळीबार

0

रावेर (शालिक महाजन): लंगडाआंबा अभयण्यात वनअधिकारी व अज्ञात व्यक्तीमध्ये गोळीबारीचे धुमकचक्र उडाले असून यात या झोनचे आरएफओ थोडक्यात बचावले असुन दोन्ही कडून तब्बल 16 ते 17 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या बाबत वृत्त असे की सातपुड़ा पर्वत रांगा मध्ये वसलेले लंगडाआंबा येथे काही अज्ञात लोकांकडून वनविभागाच्या दिशेने अचानक फायरिंग केली यात त्यांनी दहा राउंड फायर केले असून वन विभागाच्या अधिका-यांनी देखिल जबाबी फायरिंग केली असून यात त्यांनी सहा राउंड फायर केले आहे.या दोघांच्या धुमकचक्रात लंगडाआंबा झोन आरएफओ थोडक्यात बचावल्याची प्राथमिक माहिती आहे दोघांमध्ये एकूण 16 ते 17 राउंड फायर झाले आहे.वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी,एसआरपी प्लाटून लंगडाआंबाच्या दिशेने ताबडतोब रवाना झाल्याची देखिल माहिती आहे.शिकारी असल्याचे संशय वन विभागा कडून व्यक्त होत आहे.