मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख ठरली

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांची माहिती

मुंबई : शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण केंद्रीय निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिले. यानंतर ठाकरे गटाने या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हा निकाल उद्याच जाहीर होणार असल्याचं सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायलयाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय आल्यास विद्यमान सरकार कोसळू शकते असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून आम्ही सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली असल्याने कोणताही धोका नसल्याचं सांगितलं जात आहे. आता हा निर्णय उद्याच असल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावण्यासंदर्भात माहिती दिली. उद्या दोन घटनापीठातील महत्वाची प्रकरणी निकाल द्यायचा आहे. समलिंगी विवाहप्रकरणी सुरू असलेली सुनावणी उद्या दुपारी १२ वाजता करण्यात यावी, कराण उद्या सकाळीच महत्वाच्या सुनावण्या लिस्टिंग आहेत, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.