मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ‘या’ महिला नेत्याची वर्णी?

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार? सूपर्ण महाराष्ट्राचे लागले लक्ष

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होताच राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी अनेक मोठ्या नेत्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शरद पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांची नावे चर्चेत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार ऐवजी सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

सुप्रिया सुळे या आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. सुप्रिया सुळे कर्नाटकात प्रचाराला जात असल्याने त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याचे संकेत वर्तवले जात आहे. जर हे संकेत खरे ठरले तर राष्ट्रवादी पहिल्यांदा महिला अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चाही सुरू आहे.

सुप्रिया सुळेच होणार राष्ट्रवादीच्या अध्यक्षा!

सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे. अजित पवार यांचं कथित नाराजी नाट्य सुरू असतानाच पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, अशी माहिती मिळते आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे न घेतल्यास खासदार सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार आहेत, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, “केंद्रात सुप्रिया सुळे तर राज्यात अजित पवार, अशी कामाची विभागणी आधीच झाली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास अडचण नाही, असा राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.