Bigg Boss OTT : देशभर लोकप्रिय झालेला ‘बिग बॉस ओटीटी’ रिॲलिटी शो सलमान खान होस्ट करणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीझन जिओ सिनेमावर येत्या काही दिवसांतच रिलीज होणार आहे. तसेच हा शो जिओ सिनेमावर ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ चालू राहणार असल्याची माहिती आहे.
जिओ सिनेमावर रिलीज होणाऱ्या ‘बिग बॉस ओटीटी’ रिॲलिटी शो चा एक प्रोमो व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये सलमान या शोची घोषणा करताना दिसत आहे. सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.
प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणाला आहे की, क्रिकेट नंतर काय हवे, मनोरंजन २४ तास फक्त जिओ सिनेमावर आहे. मी घेऊन येत आहे बिग बॉस ओटीटी, चला तर मग बघूया. हा शो जिओ सिनेमावर येणार आहे. हा व्हिडीओ समोर येताच चाहते खूपच उत्साहित झाले आहेत.
बिग बॉस ओटीटीचे स्पर्धक :
बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धकांची नावे जाहीर झालेली नाहीत. मात्र कार्यक्रमात धीरज धूपर, फैजू शैख, जिया शंकर, राजीव सेन, पूजा गौर, अंजली अरोरा आणि आदित्य नारायण हे स्पर्धक म्हणून दिसणार असल्याची शक्यता आहे.