बिहार :- बिहारच्या एका छोट्या गावात खगौल येथे राहणा-या मधुमिता शर्मा हिला जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी गुगलने एक कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे. मुलाखतीच्या ७ फे-यांनंतर मधुमिताची निवड करण्यात आली. सोमवारी मधुमिता गुगलच्या स्विझर्लंड येथील मुख्य कार्यालयात कामावर रुजू होणार आहे.
मधुमिता लहानपणापासूनच एखाद्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न पाहायची, आणि अखेर तिला मेहनतीचे फळ मिळाले. तिला मिळालेलं यश पाहून सर्वच आनंदी आहेत असे मधुमिताची आई चिंता शर्मा म्हणाल्या. परदेशामध्ये अडीच महिन्याच्या कालावधीत मधुमिता गुगल इंटरव्ह्यूच्या सात फे-या पास झाली. इंटरव्ह्यू पास होणारी मधुमिता भारतातील एकमेव उमेदवार होती, आणि तिची गुगलने निवड केली. मधुमिताची गुगलच्या स्विझर्लंड येथील मुख्य कार्यालयात टेक्निकल सोल्यूशन इंजिनिअर या पदासाठी निवड झाली आहे. मधुमिताची एक बहिण डॉक्टर , तर भाऊ इंजिनिअर आहे. तिचे वडिल सुरेंद्र शर्मा रेल्वेमध्ये सहायक आरपीएफ कमांडंट आहेत, तर आई गृहिणी आहे.