पाटणा: कोरोनाच्या काळात होणारी पहिली निवडणूक म्हणून बिहार विधानसभा निवडणुकीकडे पहिले जात आहे. गेल्या महिन्याभरापासून बिहारमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू आहे. आज बुधवारी २८ रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळपासून मतदान सुरु आहे. विधानसभेच्या ७१ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५१.६८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. शेवटचे दोन तास शिल्लक असून ६५ टक्क्यांपर्यंत मतदान होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
बिहारमध्ये संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, लोक जनशक्ती पार्टी असा सामना आहे. संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. तीन टप्प्यात ही निवडणूक होत आहे. ३ नोव्हेंबरला दुसऱ्या तर ७ नोव्हेंबरला तिसऱ्या अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरला एकत्रित मतमोजणी होणार आहे.