‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या यशाबद्दल बिल गेट्सकडून भारत सरकारचे कौतुक !

0

नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक तसेच जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी मोदी सरकारने राबिलेल्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे कौतुक केले आहे. १०० दिवसांत ६ लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे वाचून आपल्याला आनंद झाल्याचे गेट्स यांनी ट्वीट करत सांगितले आहे. यावरून त्यांनी सरकारचे अभिनंदन केले आहे.

आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 2 जानेवारी रोजी ट्विट करून, पहिल्या १०० दिवसांत आयुष्यमान भारत योजनेतून ६ लाख ८५ हजार नागरिकांना लाभ मिळाल्याचे सांगितले होते. तसेच नागरिकांकडून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. बिल गिट्स यांनी आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचे ते ट्विट रिट्विट करून भारत सरकारला शुभेच्छा देत अभिनंदन केले.

मोदी सरकारने गतवर्षी २०१८ मध्ये आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला होता. २५ सप्टेंबर रोजी दिन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी या योजनेला सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार, गरीब कुटुंबातील व्यक्तींन वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे. सध्या, बुधवारपर्यंत देशातील ८.५० लाख नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.