भुसावळ वरणगाव रोडवरील चालेल ढाबा वर बायोडिझेल, विक्री केंद्रला सील

भुसावळ प्रतिनिधी दि 1

जिल्ह्याच्या हेल्पलाइनवर मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्ह्याधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशावरून तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाने भुसावळ वरणगाव रोडवरील चाहेल ढाबा या ठिकाणी सुरू असलेल्या विक्री केंद्रावर पुरवठा विभागाने कारवाई करून तो बायोडिझेल विक्री केंद्र सील केला असून पुढील कारवाईसाठी प्रांत अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केलेला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना जिल्ह्याच्या हेल्पलाइनवर माहिती मिळाली की, भुसावळ वरणगांव रोडवर असलेल्या चाहेल ढाब्यावर बायोडिझेलची विक्री सर्रास सुरू आहे. या बाबत महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे तसेच बाजारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे व पोलीस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवून बायोडिझेल विक्री केंद्र सील केले आहे. त्यामध्ये एक नोझल मशीन एका टाकी मध्ये साडेपाच हजार लिटर बायोडीजल मिळून आले आहे. त्याचे नमुने घेण्यात येऊन सर्व मशिनरी व पंप सील करण्यात आलेला आहे. याआधी कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवण्यात येत होता मात्र जिल्हाधिकारींनी हे सर्व अधिकार प्रांत अधिकाऱ्यांना दिल्यामुळे या कारवाईचा प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे अहवाल पाठवण्यात आल्याचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी सांगितले