टेनिसपटू सानिया बनली हिरॉईन !

0

मुंबई: सध्या बॉलीवूड मध्ये बायोपिकच ट्रेंड सुरु आहे. नुकतेच संजय दत्त च्या जीवनावर आधारित “संजू” हा बायोपिक येऊन गेला. बायोपिकच्या रेस मध्ये आता एन्ट्री केलीये भारताची स्टार  टेनिसपटू सानिया मिर्झानेही.

रॉनी स्क्रूवालाने सानियाच्या बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमात सानियाची प्रोफेशनल आणि पर्सनल दोनी लाईफ दाखवली जाणार आहे. या सिनेमात दुसरं कोणी नव्हे तर खुद्द सानियाच स्वतःच्या भूमिकेत दिसणार आहे. टेनिसनंतर आता सानिया चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करीत आहे. त्यामुळे सानियाचे फॅन्स खुश होतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे.

या सिनेमासाठी लवकरच दिग्दर्शकाची निवड होणार असून बाकीही कलाकारांची निवड लवकरच केली जाणार आहे.