मध्यप्रदेशमध्ये भाजपचे १०९ आमदार गाणार सामुहिक वंदे मातरम् !

0

भोपाळ- मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् गीत म्हणण्यावर बंदी घातली आहे. राज्य सचिवालयाबाहेर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काम सुरू करण्याच्या आधी वंदे मातरम् म्हणण्याची पद्धत होती. परंतु काँग्रेस सरकारने ती पद्धत मोडीत काढली आहे. कॉंग्रेस सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजपने ७ जानेवारीला सामुहिक वंदे मातरम् गीत गायनाचे ठरविले आहे. भाजपचे १०९ आमदार सचिवालयासमोर ७ जानेवारीला वंदे मातरम् गाणार आहे.

कॉंग्रेस सरकारच्या निर्णयामुळे काल वंदे मातरम् गायन झाले नाही. कॉंग्रेसवर टीका होत आहे.