भाजपच्या जाहिरातीवरून ढोंगीपणा दिसून येतो-सिद्धरामय्या

0

बंगळूर-कर्नाटक निवडणुकीसाठी भाजप जाहिरातींवर खूप पैसा उधळत आहे. मात्र भाजप करत असलेल्या जाहिरातबाजीतून त्यांचा खोटारडेपणा व ढोंगी पणा दिसून येत असल्याचे आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. त्यांनी ट्वीटर वरून भाजपवर निशाना साधला आहे. कर्नाटकात असंतुलित भ्रष्टाचार आणि वास्तविक घोटाळे यातील फरक ओळखला जातो ज्यामध्ये भाजपाचे मुख्यमंत्री आणि त्याचे सहा डझनभर सहकारी तुरुंगात जातील असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे.