महायुतीची पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्र्यांनी केले अनेक भाष्य !

0

मुंबई: विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात मुख्यमंत्र्यांनी प्रथमच युतीच्या फॉर्म्युलाबाबत अधिकृत भाष्य केले आहे.

ज्यांनी-ज्यांनी पक्षाविरोधात जाऊन बंडखोरी केली आहे, त्यांना दोन दिवसात अर्ज मागे घ्यायला लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बंडखोरांना महायुतीत कोठेही स्थान नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना १२४ भाजप १५० तर मित्रपक्षाला १४ जागा देण्यात आल्याचे सांगितले.