छ.शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामाला भाजपाने मंजूर करून आणले -दिपक सुर्यवंशी
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
जळगाव – बंडखोर नगरसेवक पोकळे यांनी भाजपावर आरोप केलेले वृत्त आजच्या दैनिकात प्रसिद्ध झाले असून त्यांचे आरोप बिनबुडाचे असून ते खरे पाहता छ.शिवाजीनगर उड्डाणपूल हा भाजपाचे माजी पालकमंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन व जळगाव शहराचे आमदार मा. श्री. राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नामुळे होत आहे.
सदर पुलाची मुदत काही वर्षापूर्वीच संपलेली होती. परंतु जळगाव महानगरपालिकाकडे पुलासाठी पुरेसा निधी नसल्याने हे काम अनेक वर्षापासून रखडले होते. राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन बांधकाम मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील, माजी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, जळगाव शहराचे आमदार मा. राजू मामा भोळे यांनी छ. शिवाजीनगर उड्डाण पुल बांधणीसाठी निधीची मागणी केली होती.
तसेच जळगाव शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने या विकास कामातील महानगरपालिकेचा हिस्सा देखील राज्य सरकारने भरावा म्हणून आग्रह धरला होता. आणि माजी पालकमंत्री मा.गिरीशभाऊ महाजन, जळगाव शहराचे आमदार मा. राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नातून तो हिस्सा देखील राज्य सरकार कडून जमा करून घेतला होता. त्यामुळे पुलासाठीचा संपूर्ण निधी तत्कालीन राज्य सरकारच्या तिजोरीतून देण्यात आला आहे.
त्यामुळे जळगाव शहरातील जनतेचे सार्वजनिक हित लक्षात घेऊन तत्कालीन बांधकाम मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, माजी पालक मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांनी आमदार मा. राजूमामा भोळे यांची छ. शिवाजीनगर उड्डाणपुलासाठीची 35 कोटी निधीची मागणी मंजूर केली होती. सध्या तोच पूल उभारण्याचे काम सुरु आहे. भाजपाने मंजूर करून आणलेले काम हे भाजपाच होऊ देणार नाही असा प्रश्न येतोच कुठे… ?
छ. शिवाजीनगर उड्डाण पुलाचा निधी जळगाव मनपा निवडणूक २०१८ च्या निवडणुकीत मंजूर होऊन भूमिपूजन देखील झाले आहे. व याच उड्डाणपुलाच्या विकास कामाच्या जोरावर व कमळ चिन्हावर बंडखोर नगरसेवक पोकळे हे निवडून आले आहेत. व आज सुद्धा पोकळे यांचे चिन्ह कमळच आहे. हे पोकळे बहुधा विसरून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी उगाच भाजपाला बदनाम करू नये.