जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना यंदा विधानसभेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला शेवटचे काही तासच शिल्लक राहिलेले आहे. तिसऱ्या यादीत खडसे यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आज गुरुवारी जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत देखील खडसे यांचे नाव नसल्याने खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. आता जवळपास भाजपच्या सर्वच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता मुक्ताईनगरमधून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.
तिसऱ्या यादीत मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील स्थान नाही. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी भाजपात गेलेले काशीराम पावरा यांना शिरपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.