बंगळूर-कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने मतदान यंत्रात फेरफार केल्याचा आरोप काँग्रेस नेते व उपमुख्यमंत्री जी.परमेश्वर यांनी केला आहे. त्यामुळे हक्काच्या मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून, मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका वापराव्यात अशी मागणी त्यांनी केली. पदभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच परिषदेत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. दलित असल्याने उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या दावा त्यांनी नाकारला आहे.