प्रचारासाठी भाजपचा नवा फंडा

0

लातूर : भाजपने स्वस्त औषधांच्या दुकानातून आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली आहे. स्वस्तात औषध विकणाऱ्या एक हजार जेनेरिक औषधांच्या दुकानाची देशभरात साखळी कार्यरत आहे. या औषधांच्या पाकिटांवर आणि दुकानांवरही भाजप अशा शब्दांचा उल्लेख असल्याचं पाहायला मिळत आहे. ही औषधं कमी दरात उपलब्ध असल्यानं ही दुकानं नागरिकांच्या पसंतीला उतरत आहेत. मात्र, अशा प्रकारे एखाद्या पक्षानं आपला प्रचार करण्यासाठी औषधांचा वापर करणं किती योग्य आहे, असा सवाल आता विचारला जात आहे.