बंगळूर-कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. भाजपला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या आहे मात्र सत्ता स्थापनेसाठी ११३ जागेची आवश्यकता असल्याने कॉंग्रेस व जेडीएस एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा करीत आहे. दरम्यान राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. भाजपने राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. कॉंग्रेस जेडीएसने देखील सत्ता स्थापनेचा दावा करीत पत्र दिले होते. मात्र पत्रावर तीन आमदारांची सही नसल्याने राज्यपाल यांनी कॉंग्रेस जेडीएसला सत्ता स्थापनेसाठी प्रचारान केले नाही. याच्या निषेधार्थ कॉंग्रेस आणि जेडीएसतर्फे राज्यपाल यांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे.
राज्यपाल यांनी भाजपला सत्ता स्थापेसाठी निमंत्रित केले असल्याने उद्या भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता. बंगळुरुत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.