भाजपाचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे यांनी भाजपा नाथाभाऊंनी पुन्हा परतावे

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

 

भाजपाचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे यांनी भाजपा नाथाभाऊंनी पुन्हा परतावे, असे आवाहन माध्यमांशी बोलताना केले होते. या संदर्भात आमदार एकनाथराव खडसेंना छेडले असता त्यांनी स्पष्ट शब्दात भाजपात पुन्हा जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, भाजप चांगला पक्ष असलातरी काही व्यक्तींनी मला त्रास देण्याचा उडा उचलला, खोटे-नाटे आरोप केल्यानेच आपण पक्ष सोडला.

खडसे म्हणाले हे तर मैत्रीपोटी आवाहन…..

विनोद तावडे यांनी खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने भाजपात परतण्याची साद घातली होती शिवाय त्यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असल्याने त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा, असे विधान केले. भाजपात येण्याबाबत खडसे यांच्याशी किंवा पक्षश्रेष्ठींशी बोलणे झालेले नाही. त्यांना कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले. याबाबत खडसे म्हणाले, तावडे यांच्याशी फार जुनी मैत्री आहे. आम्ही सोबत काम केले आहे. त्यांनी मैत्रीपोटी हे आवाहन केले.

 

नाथाभाऊ स्पष्टच म्हणाले, मला पक्ष सोडायचा

 

नव्हता पण…

 

खडसे म्हणाले की, मला पक्ष सोडायचा नव्हता. मला काही लोक पक्षातून ढकलत आहेत, असेही बोललो होतो. नाईलाजाने पक्ष सोडावा लागला. राज्याचा विरोधी पक्षनेता असताना माझ्या अधिकारात फडणवीस यांना विधीमंडळात बोलण्याची संधी दिली. चाळीस वर्षे भाजपाचा विस्तार करण्याचे काम केले.त्यावेळी सर्वजण डोक्यावर घेत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच मी काय पक्षाला लांछनास्पद काम केले? बदनामी

केले? त्या काळात माझ्यावर आरोप लावण्यात आले. ईडी, सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशा मागे लावून मोठी बदनामी करण्यात आली. राष्ट्रवादीत आलो नसतो तर कदाचित विजनवासात गेलो असतो, असेही ते म्हणाले.