नवी दिल्ली: नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. नवीन सरकारचा शपथविधी झाला आहे. मंत्रिमंडळ कामाला देखील लागले आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती खर्च केला याबाबत चारच सुरु आहे. तसे पाहता यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वात महागडी ठरली आहे. या निवडणुकीत तब्बल 60 हजार कोटीं खर्च करण्यात आले आहेत. यापैकी 27 हजार कोटी म्हणजे जवळपास 45 टक्के रक्कम एकट्या सत्ताधारी भाजपाने खर्च केली आहे. सेंटर फॉर मिडीया स्टडीजने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
2014 आणि 2019 च्या खर्चाची तुलना केल्यास 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा खर्च हा एक अब्जावर जाण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सीएमएसचे अध्यक्ष एन भास्करा राव यांनी ही शक्यता वर्तविली आहे. 1998 मध्ये भाजपाने 20 टक्के पैसा खर्च केला होता. तर काँग्रेसने 2009 मध्ये एकूण खर्चाच्या 40 टक्के पैसा खर्च केला होता. हा खर्च आता 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. हा अहवाल दुय्यम स्तरावरील माहितीवर आधारित आहे. यामध्ये प्रत्यक्ष अभ्यास आणि विश्लेषन करण्यात आले आहे. यानुसार एका मतदारासाठी 700 रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच 12 ते 15 हजार कोटी रुपये थेच मतदात्यांना वाटण्यात आले, तर 20 ते 25 हजार कोटी रुपये प्रसिद्धी मिळविण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी 5 हजार कोटी, औपचारिक खर्च 10 ते 12 कोटी आणि अन्य खर्चासाठी 3 ते 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी अधिकाधिक पैसा हा उद्योगपतींकडून उभारण्य़ात येत असल्याचेही यामध्ये नमूद केले आहे.