कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाचा समान जागा वाटपाचा आग्रह

शिवसेना शिंदे गटाच्या वाढीव मागणीने पेच कायम

जळगाव : ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा कणा असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीची घोषणा केली आहे, असे असले तरी स्थानिक ठिकाणी समान वाटपासाठी भाजप आग्रही आहे. शिंदे गटाकडून जास्त जागा मिळविण्यासाठी शिवसेना लढत आहे. अशा स्थितीत भाजप-शिवसेना-शिंदे गटातील जागावाटपाचा वाद कसा मिटणारयुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक सुरू आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट महाविकास आघाडीही रिंगणात उतरली असूनकोणत्या पक्षाला किती जागा मिळणारयाचीही चर्चा सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत जळगाव कृउबा समितीची सत्ता फिरणार की भाजप-शिवसेना शिंदे गटाची जादू कायम राहणारखरी कसोटी आता युती आणि महाविकास आघाडीची ठरणार आहे.