इंदोर: भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांच्या मुलाने एका महापालिका अधिकाऱ्याला बॅटने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडियो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यावरून टीकेची झोड उठली आहे. इंदोर येथे हा प्रकार घडला. विजयवर्गीय हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.
हे देखील वाचा