मुंबई: लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर मंत्री पदावर विराजमान झालेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काही महिन्यांवर आलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या राज्यातील नेतृत्वात बदल होणार आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती.