काँग्रेस-राष्ट्रवादीची एकही जागा येणार नाही

0

महाजनादेश यात्रेत ना. महाजनांनी मुख्यमंत्र्यांना दिला शब्द

जळगाव: राज्यात विरोधकांची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे. काँग्रेसला तर व्हेंटीलेटर लाऊनही उपयोग नाही. राष्ट्रवादीमध्ये थोडीफार धुगधुगी उरली आहे. मी जेही आकडे आतापर्यंत सांगितले ते खरे ठरले आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी अवघ्या ३० जागा मिळतील. जिल्ह्यात तर काँग्रेस-राष्ट्रवादीची एकही जागा येणार नाही असा शब्द पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाजनादेश यात्रेप्रसंगी आयोजीत जाहीर सभेत दिला.
भाजपच्या महाजानादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवस जळगाव जिल्हा दौर्‍यावर आहेत. सागर पार्क येथील मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. स्मिता वाघ, आ. चंदूलाल पटेल, जि.प.अध्यक्षा ना. उज्वला पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आ. हरीभाऊ जावळे, महानगर जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, सभापती जितेंद्र मराठे, ललित कोल्हे, डॉ. गुरूमुख जगवाणी, भगत बालाणी, डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, जि.प.चे सभापती पोपटतात्या भोळे, कैलास सोनवणे, राजेंद्र घुगे, दिपक साखरे, दिपक सुर्यवंशी, महेश जोशी, डॉ. सुरेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते. ना. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी दयनीय अवस्था झालेली आहे. मी काही दिवसांपूर्वी दोन्ही काँग्रेसच्या ४० जागा निवडून येथील असे म्हणत होतो, मात्र आता तर दोन्ही काँग्रेसच्या ४० ही जागा निवडून येणार नाही असे मला वाटत आहे. मी जे म्हणतो ते खरे होते ते आजपर्यंत तुम्ही अनुभवले आहे असे गिरीश महाजन यांनी सांगितले. जळगाव शहराचा एका वर्षात विकास करू असे आश्वासन आम्ही दिले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे. आमच्यासाठी काश्मीर प्रश्नासारखा असलेल्या हुडकोचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे योगदान लाभले. गाळेधारकांचा प्रश्‍न आठ दिवसात सोडवू असेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.


मामा तुम्हाला नाही तर मामींना उमेदवारी देऊ
आमदार राजूमामा नेहमीच टेंशन घेतात. पण मामा तुम्ही टेंशन घेऊ नका तुम्हाला नाही तर मामींना उमेदवारी देऊ पण भाजपाचाच उमेदवार निवडून आणू असे ना. गिरीश महाजन यांनी सांगताच हास्याचे फवारे उडाले. जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठे सहकार्य केले असल्याचेही ना. महाजन यांनी सांगितले.मराठा समाजाला आरक्षण दिल्याने मराठा क्रांती मोर्चा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या योजना लागू केल्याबद्दल धनगर समाज आणि ट्रिपल तलाक बिल पास केल्याने मुस्लीम महिला यांच्यातर्फे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. आभार दिपक सुर्यवंशी यांनी मानले.