भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा नाशिकमधील आरोग्यदूत तुषार जगताप निघाला गुटखा तस्कर

महाजनांचे नेमके चाललेय काय? महाजन यांच्या आशीर्वादाने शहरातील अनेक गुन्हेगार भाजपमध्ये ‘सेटल’ होऊन पावन होतायेत का?

• नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील कारवाया माहित असतानाही यापूर्वी *रम्मी राजपूत* वर वरदहस्त ठेवला होता. त्यानंतर राजपूत हा गंगापूरच्या रमेश मंडलिक खून प्रकरणात अडकला होता. भूमाफिया प्रकरणात त्याच्यावर मकोकाही लावण्यात आला होता. त्यात आता तुषार जगतापचीही भर पडली आहे. महाजन यांच्याशी संबंधामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी जगतापच्या डोक्यावर हात ठेवला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने भाजपचेच संभाजीराजे यांच्यामागेही हा जगताप काही दिवस वावरत होता. त्याचे कारनामे माहिती होताच संभाजीराजेंनी त्याला हाकलून लावले. गिरीश महाजन मात्र सारे धंदे माहिती असूनही गुटखा तस्कर तुषार जगतापला जवळ बाळगून होते. का? ते आता खुद्द महाजनच सांगू शकतील.