लग्नाचे वय वाढविल्याने ‘लव्ह जिहाद’-भाजपा आमदार

0

भोपाळ – भाजप नेते दररोज नवनवीन वादाला तोंड फोडत असून भाजप विरोधकांच्या टीकेचे धनी होत आहे. त्रिपुरऱ्याचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी इंटरनेट महाभारत काळा पासून वापरात असल्याचा अजब तर्क लावला होता. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी नारद म्हणजे आजचा गुगल असे विधान केले होते. हे प्रकरण ताजे असतांना भाजपच्या मध्यप्रदेशातील एका आमदाराने आक्षेपार्ह विधान केले आहे.

मध्य प्रदेशातील माळवा विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार गोपाल परमार यांनी एक अजब तर्क लावत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले पूर्वी गावांमध्ये मुलांची लग्ने लहान वयातच व्हायची, मात्र जेव्हापासून सरकारने लग्नासाठी १८ वर्षांचा नियम बनवला तेव्हापासून लव्ह जिहादसारख्या घटना वाढल्या आहेत. ते शनिवारी एका कार्यक्रमात महिलांना संबोधित करत होते. परमार म्हणाले, १८ वर्षांच्या नियमानंतर मुली पळून जाऊन लग्न करत आहेत. पूर्वी गावात बालपणीच मुलांची लग्ने होत. यामुळे त्या मुलांचीही मानसिकता व्हायची. त्यामुळे अशा घटनाही होत नव्हत्या. मात्र आता उशिरा लग्न होत असल्याने मुले भटकतात. यामुळेच लव्ह जिहाद सारख्या घटना होत आहेत.