BREAKING:खासदार रक्षा खडसेंना कोरोनाची लागण

0

जळगाव ः कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यातील कोरोना बांधीतांची संख्या अडीचशेने वाढली आहे. रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः खासदार रक्षा खडसे यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे.

रात्री अचानक प्रकृती बिघडली, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्टचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यानीं स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे अवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.

मागील महिन्यात माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, मूलगी रोहिणी खडसे-खेवलकर यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता खासदार रक्षा खडसेंचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.