भाजपा अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली जेष्ठ नेत्यांची भेट

0

दिल्ली: २०१९ च्या लोकसभा निकालात भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले असून, या निकालानंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

या भेटी दरम्यान मोदी, शहा जोडीने जेष्ठ नेत्यांसोबत बराच वेळ बसून, भाजपाच्या पुढच्या रणनीतीविषयी चर्चा करण्यात आली असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला पुत्र बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपा आणि सहघटक पक्षांना ३५० जागा मिळवत कॉंग्रेस व इतर पक्षांचा धुव्वा उडवला आहे.

येत्या २६ मे ला नरेंद्र मोदी हे सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. त्याअगोदर हि भेट घेतल्यामुळे, या भेटीला महत्व मिळाले आहे.