नवी दिल्ली- प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांचे रूप असल्याचे म्हटले आहे. ‘गांधी- द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड, १९१४-१९४८’ या पुस्तक प्रकाशन वेळी गुहा बोलत होते.
‘जीना हे स्पष्ट वक्ता होते आणि एकपक्षीय एजेंडा राबवणारे चाणाक्ष राजकारणी होते. 1930 च्या दशकाच्या सुरूवातीला, पाकिस्तानची निर्मिती व्हावी आणि मी त्याचा नेता बनावे हा एकमेव एजेंडा त्यांचा होता’, असे गुहा म्हणाले. ‘पाकिस्तानची निर्मिती हेच जीनांचे एकमेव ध्येय होते. ते एक चाणाक्ष राजकारणी होते. काही बाबतीत तुम्ही भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि जीनांची तुलना करु शकतात. कारण काहीही झाले तरी चालेल पण मला निवडणूक जिंकायचीच आहे असे अमित शाह म्हणतात, आणि कितीही लोक मेले तरी चालतील, मला स्वतंत्र पाकिस्तान हवाच, अशी भूमिका जीनांची एकेकाळी होती’.
1100 पेक्षा जास्त पानांच्या ‘गांधी- द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड, १९१४-१९४८’ या पुस्तकात महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिका सोडण्यापासून त्यांच्या हत्येपर्यंतचे वर्णन करण्यात आले आहे.