आरक्षणातील दलितांचा वाटा संपवायचा घाट

0

नवी दिल्ली-संविधानात आरक्षणातील दलितांसाठी केलेली तरतूद संप्वण्याचा घाट भाजप आणि आरएसएसने घातला आहे.या दोन्ही संघटना दलितविरोधी आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते पी.एल.पुनिया यांनी केला.संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी व्यक्त केलेल्या आरक्षणाच्या भूमिकेवर पुनिया यांनी टीका केली.या दोन्ही संघटना दलित,ओबीसींच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.सामाजिक आणि आर्थिक विषमता हे मोठे आव्हान असल्याचे डॉ. आंबेडकरांना माहिती होते. ही विषमता संपवण्यासाठीच आरक्षण आणले गेले होते. भाजपाने नेहमीच संविधान बदलण्याचा प्रयत्न केला असून आता त्यांना आरक्षणावर वाद घालायचा आहे, अशा मुद्द्यांद्वारे भाजपा आणि आरएसएस हे देशातील प्रमुख प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलीत करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केला आहे.लोकांना आरक्षणाचे लालूच दाखवून एकमेकांमध्ये भांडणे लावून त्यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप उदीत राज यांनी केला.