भाजपा काढणार महाजनादेश यात्रा

0

मुंबई: राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सेना, भाजपाने कंबर कसली आहे. सेनेच्या आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद काढल्यानंतर, आता भाजपा कडून महाजनादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. महाजनादेश यात्रा येत्या १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात येणार आहे.

महाजनादेश यात्रा हि तिवसा तालुक्यातील मोझरी पासून सुरु होणार आहे. मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्थळ आहे. पहिल्या टप्प्यात मोझरी ते नंदुरबार असा टप्पा आहे. तर दुसरा टप्पा अकोले ते नाशिक असा होणार असून नाशिकला या यात्रेचा समारोप होणार आहे. राज्यातील ३० जिल्हे, साडेचार हजार किमी प्रवास, ३०० सभा असा भरगच्च कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

यात एलईडी रथावरून फडणवीस सरकारने केलेल्या कामाची चित्रफित दाखवण्यात येणार आहे. तसेच या यात्रेत जिल्ह्यातील कोणालाही ऐनवेळी प्रवेश जाणार नसल्याचे भाजपा कडून स्पष्ट करण्यात आले आहे.