बंगळूर-बंगळुरुत एका भाजपा कार्यकर्त्याची चाकून भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद अन्वर असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. बंगळुरुच्या चिकमगलोरचे जनरल सेक्रेटरी पद त्यांना देण्यात आले होते. शुक्रवारी रात्री गोवरी कलुवे भागात दोन बाईकस्वारांनी येऊन त्यांना चाकून भोसकून ठार केले अशी माहिती मिळते आहे.
BJP General Secretary of Chikmagalur, Anwar was killed by bike borne assailants in Gowri Kaluve area, last night at around 9.30 pm. #Karnataka pic.twitter.com/QFFT0HQB5w
— ANI (@ANI) June 23, 2018
मोहम्मद अन्वर यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली त्यांच्यावर तीनवेळा वार करण्यात आले अशीही माहिती समोर येते आहे. हल्ला झाल्यानंतर अन्वर कोसळले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.